पुण्यात पोलीस कर्मचारीच निघाला ‘ दुचाकी चोर ‘ , असा करायचा प्लॅनिंग की..

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात दुचाकी चोरांचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून पुरंदर तालुक्यातील निरा शहरामध्ये पोलिसांनी एका टोळक्याचा पर्दाफाश केलेला असून त्यामध्ये एक आरोपी चक्क पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर आलेली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आठ मोटरसायकल जप्त केलेल्या असून मोटरसायकल खरेदी करणाऱ्या दोन जणांना देखील अटक करण्यात आलेली आहे. मुख्य आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहे.

उपलब्ध माहितीनुसार , विनोद मारुती नामदार असे या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव असून त्याने आठ मोटरसायकल गाड्या चोरल्याची कबुली दिलेली आहे . आठही गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या त्यानंतर या गाड्या विकत घेणारे नीरा येथील अस्लम मुलानी आणि मुरूम येथील पृथ्वीराज ठोंबरे यांना देखील ताब्यात घेण्यात आलेले होते त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपी असलेला विनोद मारुती नामदार हा चक्क पोलीस कर्मचारी असून पुणे येथील मुख्यालयात काम करतो. वानेवाडी येथील तो रहिवासी असून तो मोटरसायकल चोऱ्या करायचा आणि त्यानंतर चोरलेल्या मोटारसायकल वेगवेगळ्या गावात लोकांना विकत असायचा . सध्या तो येरवडा जेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.


शेअर करा