‘ बिनशर्त ‘ पाठिंबा देऊनही शपथविधीला डावललं , मनसेमध्ये नाराजी आहे का ?

शेअर करा

लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला दिल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कमीत कमी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला बोलवण्यात येईल अशी अपेक्षा होती मात्र तसे काहीही झाले नाही. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या मनसेला साधे निमंत्रण देखील देण्यात आले नाही त्यामुळे मनसेमध्ये नाराजीची लाट पसरलेली आहे. 

शपथविधीचे निमंत्रण का देण्यात आले नाही याबद्दल मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना निमंत्रण आले होते की नाही याबद्दल मला नीट माहिती नाही त्याबद्दल स्वतः राज ठाकरे बोलतील. सुधीर मुनगंटीवार यांचा मला फोन आलेला होता त्यांच्याशी बोललो मात्र राज ठाकरे यांना त्यांनी वैयक्तिक फोन केला असेल याबाबत मला कल्पना नाही असे म्हटलेले आहे. 

सुधीर मुनगंटीवार यांनी बाळा नांदगावकर यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आम्हाला निमंत्रण आलेले नाही असे सांगितले होते . ही बाब मी वरिष्ठांच्या कानावर घालेल कारण घाईघाईमध्ये ते विसरले असतील या दुसरे काही कारण असल्याचे वाटत नाही. केंद्रीय पक्षाने याची नोंद घ्यायला हवी जेव्हा एखादा मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा असे होऊ नये असे ते पुढे म्हणाले. 


शेअर करा