महत्वाची बातमी..महाराष्ट्र सीईटी 2024 चा निकाल आज जाहीर होणार

शेअर करा

महाराष्ट्र सीईटी 2024 चा निकाल आज संध्याकाळी सहा वाजता नंतर जाहीर होणार असून सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर या संदर्भात माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

सीईटी विभागाकडून आज 16 जून 2024 रोजी सकाळी जाहीर केलेल्या नोटीसमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पदवी अभियांत्रिकी अर्थात इंजिनिअरिंग , औषध निर्माण शास्त्र अर्थात फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपचा निकाल आज संध्याकाळी सहानंतर जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र लॉ सीईटी 2024 पाच वर्षांकरिताचा निकाल देखील आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
आज संध्याकाळी सहानंतर परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी खालील वेबसाईटवर क्लिक करून आपली गुणपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकतात.

https://cetcell.mahacet.org/
https://portal.maharashtracet.org/


शेअर करा