मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेचे महाराष्ट्रात कौतुक , अपघात झालेला दिसला अन..

शेअर करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या संवेदनशील स्वभावाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात परिचयाचे असून रस्त्यावर अपघात झाल्यानंतर ते अपघातग्रस्तांसाठी देखील देवदूत ठरलेले आहेत. शुक्रवारी रात्री दीड वाजता ठाण्यातील विक्रोळीजवळ एक अपघात झालेला होता. 

एकनाथ शिंदे आपल्या घराकडे परतत असताना अपघात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यावेळी त्यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि अपघातग्रस्तांची चौकशी करत तात्काळ सूत्रे हलवत अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला. 

अपघातातील तरुण आणि मुस्लिम कुटुंबातील महिला हे सोबत होते त्यात दोघांनाही दुखापत झाल्याचे समोर आले त्यावेळी त्यांनी आपल्या ताब्यातील गाडी घेऊन त्यांना जवळच्या गोदरेज रुग्णालयात दाखल करून तिथे फोन करून लवकरात लवकर उपचार करण्यास सांगितले आणि आपला एक अधिकारी देखील त्यांना मदतीसाठी दिला. दोघांचीही प्रकृती सध्या सुखरूप असून एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेचे महाराष्ट्रात कौतुक केले जात आहे.


शेअर करा