रात्रीच्या सुमारास दुचाकीवर जात असताना बिबट्याचा हल्ला , दुचाकी पडली अन.. 

शेअर करा

राहुरी संगमनेर आणि श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा उपद्रव वाढलेला पाहायला मिळत असून राहुरी तालुक्यातील वरवंडी इथे रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवर चाललेल्या एका कुटुंबावर बिबट्याने अचानक हल्ला केला त्यात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झालेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , नवनाथ सकाहरी ढगे ( राहणार वरवंडे ) हे रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांची पत्नी आणि दोन मुलांच्या सोबत घराच्या दिशेने चाललेले होते त्यावेळी अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. दुचाकी पडल्यानंतर बिबट्याने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या प्रमाणात आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पळून गेला. 

नवनाथ ढगे यांच्या पत्नी हल्ल्यात जखमी झालेल्या असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याचा उपद्रव वरील तीनही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळत असून वनविभागाकडून अनेकदा पिंजरे लावण्यात येतात मात्र काही दिवसात पाठपुरावा गावकरी घेत नाहीत त्यामुळे देखील बिबटे ताब्यात येत नसल्याचे चित्र आहे.  


शेअर करा