राहुरी तालुक्यात विवाहित तरुणाची रेल्वेपुढे उडी , कुटुंबीय म्हणतात की.. 

शेअर करा

राहुरीत एक खळबळजनक अशी घटना तालुक्यातील मुसळवाडी इथे समोर आलेली असून एका विवाहित तरुणाने सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास टाकळीमिया रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेसमोर उडी घेऊन आयुष्याचा शेवट केलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार ,’ आसिफ आयुब पठाण ( वय 28 राहणार मुसळवाडी ) असे मयत व्यक्तीचे नाव असून एका हॉटेलमध्ये आसिफ हा आचारी म्हणून काम करत होता. गेल्या काही वर्षांपासून तो एका आजाराने त्रस्त होता त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिलेली आहे. 

सदर प्रकार समजताच पोलीस कॉन्स्टेबल राहुल यादव हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा करत उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह राहुरी येथे हलवला. मयत व्यक्तीच्या पाठीमागे आई-पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून राहुरी पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे . 


शेअर करा