राहुरी पोलिसांची ‘ फिरकी ‘ घेणे आले अंगलट ,  फोन करून म्हणाला की.. 

शेअर करा

अनेक व्यक्तींना कधीकधी लहर आली की पोलीस प्रशासनाची देखील फिरकी घ्यावीशी वाटते मात्र अनेकदा अशी फिरकी अंगलट देखील येते. असाच एक प्रकार राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी इथे समोर आलेला असून घोरपडवाडी इथे गोळीबार झाल्याचा फोन एका व्यक्तीने पोलीस प्रशासनाच्या 112 नंबर वर केलेला होता मात्र प्रत्यक्ष पथक पोहोचले त्यावेळी ही बाब खोटी असल्याचे लक्षात आले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , महेश घाडगे असे फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याने पोलीस प्रशासनाच्या 112 नंबरवर 13 तारखेला पहाटे फोन करून इथे अनिल देशमुख नावाचा एक व्यक्ती दारू विकत आहे आणि त्याने बंदूक दाखवून एके 47 या रायफल मधून माझ्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्युत्तर म्हणून मी देखील त्याच्यावर गोळीबार केला असा फोन केलेला होता. 

गोळीबार झाल्याची माहिती मिळतात पोलीस प्रशासनाने तात्काळ पथक घटनास्थळी पाठवले आणि आरोपी महेश गाडगे याला फोन करून माहिती देखील विचारली मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. विशेष म्हणजे त्यानंतर देखील पुन्हा 112 नंबरवर फोन करून त्याने रात्रभर पोलिसांना अशाच पद्धतीने दमवले त्यानंतर मात्र त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा