वाकोडी परिसरात अल्पवयीन मुलीचे टोकाचे पाऊल , कारण अस्पष्ट

शेअर करा

नगर तालुक्यात एक धक्कादायक अशी घटना वाकोडी परिसरातील पदमपुरवाडी इथे समोर आलेली असून राहत्या घरात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. 14 तारखेला ही घटना घडल्यानंतर नगर तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. तरुणीच्या मृत्यू मागील कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही

उपलब्ध माहितीनुसार, मयत मुलीचे वय पंधरा वर्षे असून सदर घटना कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ तिला बेशुद्ध अवस्थेत रात्री आठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल केलेले होते. उपचारापूर्वीच तिला मयत घोषित करण्यात आलेले असून तोफखाना पोलिसात याप्रकरणी फिर्याद देण्यात आलेली होती त्यानंतर नगर तालुका पोलिसात हे प्रकरण हस्तांतरित करण्यात आलेले आहे. 


शेअर करा