विहिरीत जिलेटीनचा स्फोट प्रकरणात अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल 

शेअर करा

विहिरीत जिलेटीनचा स्फोट होऊन त्यामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरात समोर आलेली होती. सदर प्रकरणी संजय शामराव इथापे ( राहणार टाकळी कडेवळीत तालुका श्रीगोंदा ) याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मलंग बशीर शेख राहणार ( दुर्गाव तालुका कर्जत ) यांनी संजय याच्या विरोधात फिर्याद दिलेली असून जिलेटिन अत्यंत धोकादायक असताना मजुरांना सुरक्षा न पुरवता त्यांना विहिरीत काम करण्यास सांगितले त्यातून शॉर्टसर्किट होऊन स्पॉट झाल्याने विहिरीतून तीन मजूर बाहेर फेकले गेले त्यात तिघांचाही मृत्यू झाला होता. 

नाशिक येथील बॉम्बशोधक पथकाने रविवारी घटनास्थळी भेट दिली होती. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून घटनास्थळावरून पाण्याचे नमुने तसेच केबल आदी साहित्य तपासासाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे .


शेअर करा