शेंडी बायपास चौकातील खून प्रकरणात आरोपीचा अजब दावा, मुख्य आरोपी अद्यापही गायब

शेअर करा

सांगली जिल्ह्यात एक मृतदेह आढळल्यानंतर हा खून नगरजवळील शेंडी बायपास रोडवर करण्यात आल्याचे तपासात समोर आले होते . सदर खून प्रकरणातील एका आरोपीने हा खून दुसऱ्या आरोपीकडून गावठी कट्ट्यातून चुकून गोळी सुटल्यामुळे झाला असा दावा केलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , भाऊसाहेब रामदास पवार ( वय 32 वर्ष ) असे मयत व्यक्तीचे नाव असून 14 तारखेला शनिवारी भाऊसाहेब यांचा मृतदेह सांगली जिल्ह्यातील वारणा नदीकाठी आढळून आलेला होता . रवींद्र किसन माळी ( राहणार मोरया चिंचोरे तालुका नेवासा ) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून त्याने दुसरा आरोपी गोरख अशोक माळी याच्याकडे असलेला गावठी कट्टा दाखवत असताना चुकून गोळी सुटली त्यात भाऊसाहेब पवार यांचा मृत्यू झाला असा दावा केलेला आहे. 

मयत व्यक्ती , रवींद्र माळी आणि गोरख माळी हे हॉटेल साठी लागत असलेले साहित्य आणण्यासाठी एका कारने नगरला आलेले होते. शेंडी बायपास चौकात जात असताना नागापूर येथील दूध डेअरी चौकात गोरख माळी याने गावठी कट्ट्यातून गोळी झाडली त्यात भाऊसाहेब पवार यांचा खून झाला असा दावा केलेला आहे . 

घटना घडल्यानंतर कोणाचाही फोन लागत नसल्याकारणाने पोलिसात प्रकरण पोहोचले आणि सांगली जिल्ह्यात मृतदेह आढळून आल्यानंतर या तपासाचे धागेदोरे नगर जिल्ह्यात पोहचले. आरोपीचा शोध सुरू असताना रवींद्र किसन माळी हा गावात आढळून आला आणि पोलिसांनी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा त्याने चुकून गोळी झाडली गेली त्यामुळे ही घटना घडली असा दावा केलेला आहे मात्र या प्रकरणातील दुसरा आरोपी गोरख अशोक माळी हा ताब्यात आलेला नसल्याकारणाने या प्रकरणात नक्की काय झालेले आहे हे अद्याप पर्यंत स्पष्ट झालेले नाही. 


शेअर करा