शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये फसवणाऱ्याला पोलिसांच्या हवाली केलं पण , नगरमधील घटना

शेअर करा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवत फसवणुकीचे प्रकार राज्यभर वाढलेले पाहायला मिळत असून संतप्त झालेल्या शेवगाव येथील काही गुंतवणूकदारांनी एका शेअर ट्रेडिंग व्यावसायिकाला पोलिसांच्या हवाली केलेले होते मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी शेवगाव पोलीस ठाण्यासमोरच 17 तारखेला रास्ता रोको केले. पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालत आहे असा देखील आरोप गुंतवणूकदारांनी केलेला आहे. 

चापडगाव येथील रहिवासी असलेला सुदाम बबरीवाल या शेअर ट्रेडिंग व्यावसायिकाने गेल्या चार महिन्यांपासून अनेक गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढलेले होते त्यानंतर तो फरार झाला होता.काही गुंतवणूकदारांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र त्यानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली त्यामुळे गुंतवणूकदार संतप्त झालेले होते. 

संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी त्यानंतर पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन केले. पोलीस आणि व्यावसायिक यांच्यात आर्थिक तडजोड झाल्याचा देखील आरोप गुंतवणूकदारांनी केलेला असून बबरीवाल याला आणखीन काही भागीदार आहेत. आरोपी शेअर ट्रेडिंग व्यावसायिक गावात गावठी कट्टे घेऊन फिरतात. गुंतवणूकदारांकडे यासंदर्भातील अनेक पुरावे असून देखील पोलिसांकडून आरोपींची पाठराखण सुरू आहे असे देखील आरोप गुंतवणूकदारांनी केलेला आहे. 


शेअर करा