संदीप मिटके यांच्या पथकाची शिर्डीत पुन्हा दमदार कारवाई ,  हॉटेल साई संजय इथे..

शेअर करा

वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले त्यानंतर सदर प्रकरणातील सर्व अपहरणकर्त्यांना नगर जिल्ह्यातील शिर्डी इथे कारवाई करत अटक करण्यात आलेली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिर्डी येथील हॉटेल साई संजय इथे ही कारवाई केलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील म्हसरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 

20 लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर या व्यापाऱ्याला मध्यप्रदेशात घेऊन जात त्याच्याकडून दहा लाख रुपये खंडणी वसूल करण्यात आली. सदर प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि त्याचे साथीदार हे शिर्डी येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी संदीप मिटके यांना मिळाल्यानंतर विशेष पथक शिर्डी येथे रवाना झालेले होते. 

हॉटेल साई संजय येथे सर्व आरोपी असल्याचे समजताच पथकाने तात्काळ त्यांना ताब्यात घेतलेले आहे. त्यांची नावे 1) शिवा रविंद्र नेहरकर, वय 23 वर्ष, रा. महाजन यांच्या घरात किरायाने, नंदनवन चौक, श्रीस्वामी समर्थ केंद्रा जवल, उत्तम नगर, सिडको, नाशिक, 2) शुभम नानासाहेब खरात, वय 25 वर्ष, रा. संतोषी माता नगर, सयोग रबर कंपणीच्या पाठिमागे, सातपुर एमआयडीसी , नाशिक अशी असून त्यांना म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. शिवा नेहरकर हा अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱ्याच्या दुकानात कामाला होता आणि त्याने मित्रांच्या मदतीने अपहरणाचा कट रचला आणि दहा लाखांची खंडणी उकळली.आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. 

सदरची कामगीरी मा.श्री. संदिप कर्णिक (पोलीस आयुक्त) सो, मा.श्री. प्रशांत बच्छाव सो (पोलीस उप आयुक्त गुन्हे), मा. श्री. संदिप मिटके सो (सपोआ गुन्हे), सपोनि श्री. ज्ञानेश्वर मोहिते, पोउपनि श्री. मुक्तेश्वर लाड, श्रेपोउनि दिलीप भोई, पोह/106 किशोर रोकडे, पोना/911 दत्ता चकोर, पोना/1533 रविंद्र दिघे, पोना/497 भुषण सोनवणे, पोअं/2389 भगवान जाधव, पोअं/869 अनिरूद्ध येवले, सर्व नेमणुक विशेष पथक गुन्हे शाखा, नाशिक यांनी केली आहे. 


शेअर करा