
सोशल मीडियावर सध्या एका विवाहाची जोरदार चर्चा सुरू असून 19 वर्षाच्या मुलीने चक्क 70 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडल्यानंतर विवाह केलेला आहे. पाकिस्तानातील लाहोर येथे हा प्रकार घटना उघडकीला आलेला असून 19 वर्षीय मुलगी रस्त्याने असताना तिला एक गाणे ऐकू आले म्हणून ती थांबली आणि गाणे म्हणणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. त्यांच्यात आधी मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांची लव्हस्टोरी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, लियाकत असे 70 वर्षीय व्यक्तीचे नाव असून त्यांची पत्नी असलेली शमाईला हे दोघेही सध्या लाहोरमध्ये राहत आहेत. लियाकत यांनी याप्रकरणी बोलताना, ‘ एकदा ती जात असताना आपण एक गाणे गुणगुणायला सुरुवात केली होती त्यावेळी तिने माझ्याकडे वळून पाहिले आणि आम्ही प्रेमात पडलो. माणसाचं हृदय तरुण असले पाहिजे वयाचं काय आहे ? ‘ असे म्हटले आहे.
शमाईला हिने देखील या विवाहाबद्दल भरभरून बोलताना, ‘ प्रेमात वय पाहिले जात नाही तर प्रेम होऊन जातं. वय काय जात काय प्रेमात फक्त प्रेम पाहिल जात . सुरुवातीला आमच्या घरातून या लग्नाला विरोध होता मात्र प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार आयुष्य जगण्याचा अधिकार आहे , ‘ असे म्हटले असून त्यांच्या लव स्टोरीवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.