51 व्या वर्षी भाजप खासदार मनोज तिवारी यांनी दिली गुड न्यूज

शेअर करा

मनोज तिवारी

लोकसंख्या विधेयक आणण्याची चर्चा देशात रंगलेली असतानाच दुसरीकडे भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी अर्थात रिंकिया के पापा गाणे म्हणणारे गायक यांनी 51 व्या वर्षी आपण वडील झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिलेली आहे. सोशल मीडियावर त्यांनी बायकोसोबत हॉस्पिटलमध्ये फोटो शेअर करून या पाहुण्याच्या आगमनाची त्यांच्या चाहत्यांना खबर दिलेली आहे.

मागील महिन्यातच मनोज यांची पत्नी सुरभी तिवारी यांचे घरात डोहाळेजेवण पार पडले होते तेव्हापासूनच मनोज तिवारी हे गुड न्यूज कधी देणार याची सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा होती. मनोज तिवारी यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक जणांनी त्यांच्या घरात नवीन पाहुणी आल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मनोज तिवारी यांना कन्यारत्न झालेले असून फोटो शेअर करताना त्यांनी , ‘ तुम्हाला सांगायला फार आनंद होत आहे कि आमच्या घरी लक्ष्मीचा पाठोपाठ सरस्वतीचे आगमन झालेले आहे. घरात लहान मुलीचे आगमन झालेले आहे. तिच्यावर तुमच्या सगळ्यांचे असेच आशीर्वाद असू द्या ‘, असे म्हटले आहे.

सुरभी तिवारी ही मनोज यांची दुसरी पत्नी असून पहिल्या पत्नीपासून मनोज तिवारी यांना एक मुलगी आहे. 2020 मध्ये मनोज यांनी सुरभी यांच्यासोबत लग्न केले होते. भाजपचे खासदार रवि किशन यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला चार मुले झाली यासाठी काँग्रेस जबाबदार आहे कारण कुटुंब नियोजनाच्या बाबतीत कॉंग्रेसने त्या वेळी योग्य निर्णय घेतला नाही, असे सांगितले होते त्यानंतर मनोज तिवारी यांच्या या बातमीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झालेली आहे


शेअर करा