52 वर्षीय महिलेने केले मुलाच्या वयासोबतच्या तरुणाशी लग्न : व्हिडीओ

शेअर करा

52 वर्षीय महिलेने

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच विवाहाची जोरदार चर्चा सुरू असून या विवाहात एका 52 वर्षीय महिलेने चक्क 21 वर्षाच्या मुलासोबत लग्न केलेले आहे. आपल्या मुलाच्या वयाच्या तरुणाशी लग्न करणाऱ्या या महिलेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून त्यांच्या या लग्नावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून त्यामध्ये दोघांनीही गळ्यात हार घातले आहेत त्यावेळी त्या मुलाला तुम्ही दोघेही विवाहित आहेत का ? असा प्रश्न विचारल्यानंतर तो हो असे सांगतो. आपले वय 21 वर्षे असून आपण 52 वर्षांच्या महिलेसोबत विवाह केलेला आहे. प्रेमाला वय नसते प्रेम कधीही होऊ शकतो, असे देखील हा तरुण यावेळी सांगतो.

व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारा व्यक्ती त्यांना तुम्ही या लग्नामुळे खुश आहात का ? असे विचारतो त्यावेळी महिला आम्ही दोघेही खूप खुश आहोत कारण त्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त माझा विश्वास आहे. मी त्यांना तीन वर्षांपासून ओळखत आहे असे देखील ती सांगते. अमित चतुर्वेदी नावाच्या एका अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये त्याने ‘ और इनकी वरमाला होते ही कलियुग का अंतिम चरण प्रारम्भ हुआ…सेकंड लास्ट अध्याये स्वाहा ‘असे म्हटले आहे


शेअर करा