कर्नाटकातील भाजप नेते आणि माजी जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांचा अश्लील व्हिडीओ गेल्या काही महिन्यापूर्वी जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी एका भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला असून हा व्हिडीओ कॉल करतानाच व्हिडीओ आहे. संबंधित नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे . घटना तामिळनाडू येथील असून तामिळनाडूचे भाजपाचे महासचिव के टी राघवन KT Raghavan यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
काय आहे प्रकरण ?
सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असलेल्या हा व्हिडिओमध्ये के टी राघवन यांच्यासारखी हुबेहुब दिसणारी एक व्यक्ती पक्षातीलच एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. मदन रविचंद्रन Madan Ravichandran यांनी हा व्हिडीओ युट्युबवर प्रसारीत केला आहे पण या व्हिडीओच्या विश्वासहार्यते बद्दल मात्र अद्याप साशंक वातावरण आहे. के टी राघवन यांनी एक ट्वीट करत संबंधित आरोपांचं खंडण करत संबंधित व्हिडीओबाबत आपण कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
के टी राघवन म्हणाले की, “तामिळनाडूचे लोक, पक्षाचे कार्यकर्ते आणि जे माझ्याबरोबर आहेत त्यांना माहीत आहे की मी कोण आहे ? गेली 30 वर्षे मी कोणत्याही फायद्याशिवाय पक्षाचं काम करत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओबाबत मला कळलं आहे. माझी आणि पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासाठी हा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. पण माझ्यावर झालेले सर्व आरोप खोटे आहेत. शेवटी न्यायाचाच विजय होईल. “
संबंधित व्हिडीओ युट्युबवर प्रसारित करणाऱ्या रविचंद्रन यांनी असा दावा केला आहे की, ‘ त्यांच्या टीमकडे अशा 15 नेत्यांच्या ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ फुटेज आहेत, जे येत्या काळात युट्युबवर टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केले जाणार आहेत. भाजप नेत्यांकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाचे आणि अत्याचाराबाबत अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर संबंधित नेत्यांविरोधात स्टींग ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाची प्रतिमा सुधारणं हेच आपलं ध्येय आहे ‘. मात्र व्हिडीओ व्हायरल होताच चक्क मदन रविचंद्रन यांचीच भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे