गेल्या काही दिवसात अनेक धक्कादायक घटना राज्यात उघडकीस येत असून मोबाईल शिक्षणामुळे मुलांच्या हातात मोबाईल आल्यापासून मुले लहान वयातच तसल्या प्रकाराच्या आहारी जाण्याची भीती आणखीन वाढली आहे . मुंबई अशीच एक धक्कादायक घटना मालाड नजीक असलेल्या कुरार परिसरात उघडकीस आली आहे . कुरार येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीनं आपल्या 13 वर्षीय भावाला अश्लील व्हिडीओ दाखवून त्याला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं मात्र त्यानंतर संबंधित तरुणी 5 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित १६ वर्षीय मुलीला मोबाईल हाती येताच अश्लील व्हिडीओ पाहण्याचं व्यसन जडलं. ती आपल्या लहान भावासोबत कॉटखाली झोपायची आणि घरातील सर्वजण झोपी गेले कि ती आपल्या मोबाईलवर 13 वर्षीय भावाला अश्लील व्हिडीओ दाखवायची. त्यातूनच तिने आपल्या भावावर दबाव टाकून त्याला त्याला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. मागील बऱ्याच दिवसांपासून हा संतापजनक प्रकार सुरू होता मात्र त्यातून ही 16 वर्षीय तरुणी गर्भवती राहिली असे या तरुणीचे म्हणणे आहे .
पोटात दुखतंय म्हणून मुलीला दवाखान्यात नेलं असता घडलेला प्रकार ऐकून डॉक्टरसोबत पालकांना देखील धक्का बसला आहे .पोलिसांनी चौकशी केली असताना अल्पवयीन भावाने दिलेल्या जबाबावरून त्याने दिलेल्या माहितीत पोलिसांना तथ्य आढळून आले. पीडित भावानं पोलिसांना सांगितलं की, जेव्हा तो लैंगिक संबंध ठेवण्यास नकार द्यायचा तेव्हा त्याची बहिण त्याला मारहाण करण्याची आणि घटनेची वाच्यता करण्याची धमकी द्यायची. त्यामुळे बहिणीच्या धमकीला बळी पडून तो बहिणीसोबत अश्लील कृत्य करण्यास तो तयार होत होता. पोलिसांनी त्यानंतर बहिणीची देखील चौकशी केली आहे.
दोघांचाही जवाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पीडित अल्पवयीन भावाला बाल सुधारगृहात पाठवलं आहे तर संबंधित तरुणी सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजते. तरुणीच्या जबाबात कितपत तथ्य आहे यासाठी तिच्या पोटातील गर्भाची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे .डिएनचा रिपोर्ट आल्यानंतर या घटनेबाबत अधिक माहिती समोर येईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.