महिला डॉक्टरचा पाठलाग करून इंजिनीअर म्हणाला ‘ हा ‘ शब्द, नोकरीतून काढण्याचे निर्देश

शेअर करा

नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात महिला डॉक्टरची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना दोन दिवसापूर्वी उघडकीस आली होती. ॲाक्सिजन प्लांट उभारणाऱ्या कंपनीच्या इंजिनीअरने छेड काढल्याचा आरोप आहे. छेड काढणारे आरोपी हे डॉक्टर महिलेचा पाठलाग करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर निवासी डॉक्टरांमध्ये संतापाचं वातावरण आहे. कामाला म्हणून आलेल्या या कर्मचाऱ्यांकडून असा प्रकार घडल्याने डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

काय आहे प्रकरण ?

तक्रारदार महिला डॉक्टर मेडिकल रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागात कार्यरत आहे. मेडिकलच्या परिसरात ग्लोबल सर्व्हिसेस या खासगी कंपनीकडून लिक्वीड ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जात आहे. येथील दोन-तीन कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून संबंधित महिला डॉक्टरचा पाठलाग करत होते. सुरुवातीला डॉक्टरने त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र गुरुवारी दुपारी ती ॲाक्सिजन प्लांट समोरुन जात असताना पुन्हा त्यांनी पाठलाग केला तसेच आरोपी इंजिनीअर तिला ‘ चल ‘ असे वाईट भावनेने म्हणाल्याचा महिला डॉक्टरचा आरोप आहे .

अचानक आपल्यासोबत घडलेल्या या प्रकारानंतर महिला डॉक्टर घाबरून गेली आणि तिने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला याची माहिती दिली. जवानांनी दोघांना पकडून वैद्यकीय उपाधीक्षकांसमोर उभे केले. त्यांनी संबंधित कंपनीला पत्र लिहून दोन्ही कामगारांना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या प्रकारामुळे महिला डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण असून निवासी डॉक्टरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


शेअर करा