पुणे हादरले..अनैतिक संबंधांच्या संशयातून नवऱ्याने बायकोचा पाठलाग केला खरा मात्र रंगेहाथ दिसताच…

पत्नीच्या चारित्र्याचा गेल्या काही दिवसांपासून पतीला संशय येत होता यामुळे त्याने तिच्या नकळत तिचा पाठलाग करणे सुरू केले आणि आपली 21 वर्षाची पत्नी पन्नास वर्षाच्या व्यक्तीबरोबर जात असल्याचे त्याला आढळून आले. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला त्याच्यासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर त्याने पत्नीवर राग व्यक्त करणे सुरु करताच संतापलेल्या पत्नीने त्यालाच मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली आहे.

काय आहे प्रकरण ?

पुणे शहरातील कोंढवा भागात घडलेली ही घटना आहे. पत्नी 50 वर्षीय व्यक्तीसोबत फिरताना आढळून येताच संतापलेल्या पतीने राग व्यक्त करताच पत्नीने आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीने पतीला दोघांनी मिळून मारहाण केली. कोंढव्यातील बिस्मिल्ला हॉटेलजवळील कम्युनिटी सोसायटीमध्ये मंगळवारी संध्याकाळी चार वाजता ही घटना घडली आहे.

बायकोचा आणि तिच्यासोबत असलेल्या तिच्या कथित प्रियकराचा सपाटून मार खाल्यानंतर हतबल झालेल्या पतीने त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात सदर प्रकाराबद्दल फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पन्नास वर्षीय व्यक्ती व फिर्यादीच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकाराची कोंढवा परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे