बीड हादरले..जेवायला म्हणून घरी बोलावलेल्या बाबाकडून ‘ नको ते ‘ ?

शेअर करा

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात कोळगाव येथील सूर्य मंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे यांना अखेर सहा महिन्यांनी गुरुवारी सव्वीस तारखेला अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यापासून बराच काळ ते फरार झाले होते त्यात औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.

काय आहे प्रकरण ?

गेवराई तालुक्यातील नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने हनुमान महाराजांवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यावरून ४ फेब्रुवारी २०२१ रोजी चकलांबा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध विनयभंग बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व ॲट्रॉसिटी अन्वय गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दिनांक 30 व 31 जानेवारी रोजी जेवणासाठी घरी आलेल्या हनुमान महाराजांनी अश्लील संवाद करून विनयभंग केल्याचा आरोप पीडित मुलीने केला होता.

गुन्हा नोंद झाल्यानंतर फरार झालेल्या हनुमान महाराजांनी दुसऱ्या दिवशी सर्व आरोप फेटाळून लावले होते. निर्जनस्थळी एका बाभळीच्या झाडाखाली बसून आत्महत्या करत असल्याचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. चिठ्ठीत १० ते १२ जणांची नावे होती, त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र शोध घेऊनही महाराज पोलिसांच्या हाती आलेले नव्हते. खंडपीठाने जामीन नाकारल्याने २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ते गेवराईमार्गे परराज्यात पळून जात असल्याची कुणकुण लागताच उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांनी त्यांना जेरबंद केले.

गुन्हा नोंद झाल्यापासून हनुमान महाराज फरार झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता मात्र सत्र न्यायालयाने जामीन अर्जाची मागणी फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. 21 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने देखील हनुमान महाराज यांना जामीन देण्यास नकार दिला आणि त्यानंतर या महाराजाच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे.


शेअर करा