पुणे हादरलं ..’ चल तुला कात्रजला सोडतो ‘ त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती गाडीत बसली अन त्यानंतर ..

शेअर करा

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहे .पुण्यातील दत्तवाडी परिसरात एका 25 वर्षीय मतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून सदर घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे . मतिमंद तरुणीला घरी सोडतो, असे सांगून या नराधमांनी तिला आपल्यासोबत घेतले आणि त्यानंतर तिच्यासोबत हा घृणास्पद प्रकार केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अवघ्या काही तासांत पोलिसांनी चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

पुणे परिसरातील जनता वसाहत इथे ही घटना घडली आहे. 25 वर्षीय पीडित मुलगी काल सायंकाळी स्वारगेटवरून कात्रजला आपल्या घरी चालली होती. यावेळी आरोपीनं ‘ तुला घरी सोडतो’ असं खोटं सांगून पीडितेला जनता वसाहतीत नेण्यात आलं. तिथे नेल्यानंतर चार जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला आहे. श्रीकांत सरोदे, आदित्य पवार, दुर्वेश जाधव आणि आशिष उर्फ राड्या मोहिते असे अत्याचार करणाऱ्या चार नराधमाची नावं असून चारही जण सध्या पोलीस कोठडीत आहेत.

25 वर्षीय पीडित तरुणी मतिमंद आहे. काल सायंकाळच्या सुमारास ती स्वारगेटवरून आपल्या घरी जात होती. दरम्यान आरोपींची तिच्यावर नजर पडली. पीडित तरुणी मतिमंद असल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपीनं तिला घरी सोडण्याचा बहाणा करत आपल्यासोबत गाडीत बसवले आणि कात्रजला घेऊन जाण्याऐवजी आपल्या घरी जनता वसाहत परिसरात नेलं आणि त्यानंतर हा प्रकार घडला. घटनेचा पुढील तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.


शेअर करा