नगर जिल्ह्यात २४ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या : कुठे घडली घटना ?

शेअर करा

नगर जिल्ह्यात २४ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे . कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतील आत्मा मालिक ध्यानपीठ कर्मचारी वसाहतीत ही घटना घडली. घरासमोरील पडवीच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून तरुणीनं आत्महत्या केली असून उज्वला शेळके असे या तरुणीचे नाव आहे . तिच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप कळू शकलेले नाही.

सदर तरुणीचे वडील जंगली महाराज आश्रमात नोकरीस करतात. ते आपल्या कुटुंबीयासमवेत कर्मचारी वसाहतीत आपली पत्नी, दोन मुली यांच्यासोबत राहत आहेत. भगवान बाबुराव शेळके (वय 55) यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे .

भगवान बाबुराव शेळके यांच्या दोन मुलींपैकी एक मुलगी उज्वला ही शनिवारी पहाटेच्या अडीच वाजेच्या सुमारास नैसर्गिक विधीचे निमित्त करून बाहेर पडली. बराच उशीर होऊनही मुलगी घरात का आली नाही, याची चौकशी करण्यासाठी आई-वडील घराबाहेर आले असता, त्यांना उज्ज्वलाचा मृतदेह घराच्या बाहेर असलेल्या पडवीत लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला . त्यानंतर घटनास्थळी पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी भेट दिली.


शेअर करा