अनैतिक संबंधांच्या संशयाने पछाडलेल्या पतीकडून ‘ क्रूरतेचा कळस ‘ , पत्नी पोलिसात म्हणाली की ..

शेअर करा

बायकोला आपली खाजगी मालमत्ता समजण्याचे प्रकार अनेक पतीकडून होत असतात त्यातूनच तिच्यासोबत अनेक अन्याय केले जातात मात्र काही वेळा याच हक्कापायी पतीकडून अनेक वेळा मानवतेला लाजवेल असेही प्रकार केले जातात .मध्य प्रदेशमधील सिंगरोली जिल्ह्यात असाच प्रकार उघडकीस आला असून सिंगरोलीतील माडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपी पतीने पत्नीवर इतर पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत चक्क पत्नीचे गुप्तांग सुई-दोऱ्याने शिवले. पतीच्या या कृत्याने पत्नीला त्रास होऊ लागला आणि तिने पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली.

‘ पीडित महिलेचा पती तिच्यावर कायमच चारित्र्यावरुन संशय घेत होता. तुझे इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध आहेत, असा आरोप पतीकडून केला जात होता. सातत्याने तो तिच्यावर पाळत ठेवून होता आणि ती कोणाबरोबर बोलली तरी त्यावरून सतत तिच्यासोबत वाद घालत असायचा मात्र अखेर त्याच्या या संशयाचा कळस झाला आणि आरोपीने थेट गुप्तांग सुई-दोऱ्यानं शिवण्याचा किळसवाणा प्रकार केला, ‘ अशी माहिती सिंगरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल सोनकर यांनी दिली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार , “संशयाने पतीला आंधळं केलं होतं. याच संशयातून त्याने आपल्या मर्यादा ओलांडत सुई-दोऱ्यानं गुप्तांग शिवलं.”

पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी पतीविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. ‘ हे कृत्य अत्यंत निर्दयी , अमानवीय आणि पीडितेला भयंकर त्रास देणारं आहे ‘ , असं मत पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केल आहे तसेच आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असेही सांगितले आहे . पोलिसांनी पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी देखील करुन घेतली असून सध्या आरोपी पती फरार आहे.पोलीस त्याच्या शोधासाठी छापेमारी करत आहेत.


शेअर करा