नगर जिल्ह्यात पुन्हा ‘ बालिका वधू ‘, ‘ ह्या ‘ ठिकाणी प्रकार उघडकीस

शेअर करा

नगर जिल्ह्यात कोरोना लॉकडाऊनचा फायदा उठवत कमी खर्च होणार म्हणून अल्पवयीन मुलींचे लग्न लावल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या त्यातच आणखीन एक घटना समोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी येथे 14 वर्षाच्या मुलीचे लग्न लावण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नवरदेव मुलगा, मुलाचे आई-वडील मुलीचे वडील लग्नाचा विधी करणारा भटजी, लग्नात मंडप सजावट करणाऱ्या व्यक्ती तसेच लग्नात उपस्थित राहिलेल्या इतर व्यक्तींच्या विरोधात शुक्रवारी सत्तावीस तारखेला बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शिरसाटवाडी येथील ग्रामसेविका अर्चना विठ्ठल सानप यांनी याबद्दल फिर्याद दिली आहे. शिरसाटवाडी येथील येथे 25 ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची माहिती मुंबई येथील मर्जी संघटनेचे संस्थापक मंगेश सोनवणे यांना मिळाली होती. सोनवणे यांनी यासंदर्भात नगर चाईल्डलाईन, बाल कल्याण समिती तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना माहिती दिली. त्यानंतर चाईल्ड लाईनचे सदस्य प्रवीण कदम यांनी शिरसाटवाडी येथील ग्रामसेवक सरपंच व पाथर्डी पोलिसांशी संपर्क केला आणि सदर विवाह झाल्याची खात्री केली. जेव्हा विवाह झाला त्यावेळी मुलीचे वय अवघे 14 वर्षे होते. ग्रामसेविका सानप यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मंगेश सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार, ‘ बालविवाह रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामसेवक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींची स्थानिक समिती कार्यरत असते . कुठे बालविवाह होत असेल अथवा झाला असेल तर दोषींविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी या समितीची असते. शिरसाटवाडी येथे बालविवाहाची घटना स्थानिक समितीला कशी समजली नाही ? याप्रकरणी कारवाई होण्यासाठी आम्हाला मुंबईतून पाठपुरावा करावा लागला. याप्रकरणी कारवाईसाठी चाईल्डलाईनने देखील महत्त्वाची भूमिका निभावली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाअसून आता या प्रकरणाचा सविस्तर तपास करून पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी’ असे म्हटले आहे


शेअर करा