जावयाच्या ‘ त्या ‘ खुनाचे रहस्य अखेर उलगडले , मास्टरमाईंड गजाआड

शेअर करा

लग्न झाल्यानंतर देखील पत्नी सातत्याने आपल्या जुन्या प्रियकराच्या संपर्कात राहत होती त्यातूनच तिने आपल्या जुन्या प्रियकराला ती रक्षाबंधनाला गावी येणार असल्याची माहिती सांगितली. जुन्या प्रियकराला देखील त्याच्या या प्रेमप्रकरणात प्रेयसीच्या पतीची अडचण होत होती त्यामुळे पतीचा अमानुषपणे खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात उघडकीस आली आहे .

काय आहे प्रकरण ?

एक विवाहित महिला आपल्या पतीसोबत तिच्या माहेरी अकोले येथे आली होती. पतीसोबत आल्यानंतर तिचा पती बाहेर गेला असताना अचानक त्याची हत्या झाली. कोणाशी जास्त ओळख पाळख नसताना देखील जावई गावात आला आणि त्याची हत्या झाली, या विचारांनी अनेकांच्या मनात प्रश्नाचे काहूर माजले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरु केला असता धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित घटना ही मृत व्यक्तीच्या पत्नीच्या लग्नाआधीच्या प्रेम प्रकरणातून घडल्याचं धक्कादायक सत्य समोर आल.

महेश चव्हाण हे मृत पतीचे नाव असून ते पत्नीसोबत तिच्या माहेरी अकोले येथे गेले होते . त्यांची हत्या होताच पोलिसांनी तपास केला असता मृतक महेशच्या पत्नीचं लग्नाआधी शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी याच माहितीचा धागा पकडत तपास सुरु केला आणि आरोपी अनिकेत शिंदेला ताब्यात घेतलं. सुरुवातीला टोलवाटोलवी केल्यानंतर अखेर त्याने या खुनाची कबुली दिली असून यात त्याने त्याचा चुलत भाऊ गणेश शिंदे यानेदेखील साथ दिली असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी अनिकेत शिंदे याने दिलेल्या माहितीनुसार, ‘ अनिकेतचं महेशच्या पत्नीसोबत लग्नानंतरही प्रेमसंबंध होते. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात थोडासा दुरावा आला होता. कारण महिलेचा पती महेशमुळे त्यांना भेटता येत नव्हतं. यादरम्यान रक्षाबंधनाच्या निमित्ताने महेश सासुरवाडीला आला. याबाबतची माहिती अनिकेतला मिळाल्यानंतर त्याने आपल्या चुलत भावासोबत महेशच्या हत्येचा कट आखला. त्यांनी महेशला भालदवाडी-अकोले शिवारात घेरत त्याचा जीव घेतला,’ अशी कबुली आरोपीने दिली आहे.


शेअर करा