नागपूर हादरलं..’ बोधी निवासात काहीतरी घडलंय ‘, पोलिसांनी जाऊन पाहीलं तर ..

शेअर करा

धर्माच्या नावाने समोरच्याला उपदेश करणारे गुरु स्वतःच्या आयुष्यात मात्र त्यांचा अगदी उलट व्यवहार करत असतात याचाच प्रत्यय अनेकदा आपल्याला येत असतो. अशीच एक घटना नागपूर इथे उघडकीस आली आहे .पवित्र दीक्षाभूमी असलेल्या नागपूर शहरात बोधी निवासात एका महिला बौद्ध भिक्खुच्या सोबत राहत असलेल्या पुरुष बौद्ध भिक्खुने तिची अमानुषपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुद्ध विहारातच ही घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या दहेगाव पिवळा इथं असलेल्या शिवली बोधी भिक्खु निवासात ही घटना घडली आहे. श्रामनेरी बौद्धप्रिया असं मृत महिला भिक्खुचं नाव आहे तर भदंत धम्मानंद थेरा असे आरोपीचे नाव आहे. आरोपी भदंत धम्मानंद थेरा देखील याच निवासात राहत होता मात्र दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होत होते मात्र त्याचे पर्यवसान इतके गंभीर होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

२९ तारखेला पुन्हा एकदा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरु झाले आणि काही वेळातच भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे रागाच्या भरात भदंत धम्मानंद याने चाकू आणि लोखंडी रॉडने श्रामनेरी बौद्धप्रिया यांच्यावर वार केले. चाकूचे वर्मी घाव बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन श्रामनेरी बौद्धप्रिया यांचा जागेवरच मृत्यू झाला.

सदर घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी भिक्खु निवासाकडे धाव घेतली असता घटनास्थळी श्रामनेरी बौद्धप्रिया यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनास्थळावर चाकू आणि लोखंडी रॉड पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा असून श्रामनेरी बौद्धप्रिया यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे तर आरोपी भदंत धम्मानंद याला अटक केली आहे.


शेअर करा