मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे राज ठाकरेंना ‘ ह्या ‘ शब्दात आव्हान

मुंबई: मंदिरं सुरू केली नाही तर आम्ही घंटानाद आंदोलन करू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांना खडे बोल सुनावताना ‘ घंटानाद करा नाही तर आणखी कसला नाद करा. पण आमचा नाद करायचा नाही ‘, असे आव्हान दिल्याने मुंबईच्या महापौर विरुद्ध मनसे वाद पेटण्याची चिन्हे आहेत .

महापौर किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी संवाद करताना मनसेने कोरोनाचे नियम झुगारून दहीहंडी साजरी केली , त्यावरही भाष्य केले त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘ राजकिय पोळ्या भाजून घेणारे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो असं दाखवतात. पण त्यांच या मागे राजकारण आहे. हे सर्वसामान्य लोकांनाही माहीत आहे. विरोधकांनी भावनेचा नाही लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा हे सगळे बिळात जातात ‘.

रडणाऱ्या मनसे नेत्यावरही केले भाष्य

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा रडताना एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता त्यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, ‘ मनसेच्या एका नेत्याचा कोव्हिडच्या आधीच्या लाटेतला रडतानाचा व्हिडीओ मला अनेकांनी दाखवला. तेव्हा हे रडत होते. आता हे दहिहंडीसाठी लोकांना गर्दी करण्याकरता उकसवत आहेत. यांचं तेव्हाच वागणं खरं की आताचं वागणं खरं हे समजत नाही. मनसेच्या त्या´ नेत्याचे अश्रू हे मगरमच्छ के आंसू´ समजायचे का ?, असा सवाल त्यांनी केला

मुंबई महापालिका तिसऱ्या लाटेसाठी सज्ज आहे. विशेषत: इमारती सील करण्याच्या मोहिमेवर आमचं लक्ष आहे. पाच माणसांना कोरोनाची लागण झालेली आढळल्यास ती इमारत किंवा सोसायटी सील करण्यात येणार आहे. मुंबईत तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य कारवाई करा, असे आदेशच त्यांनी या मार्शलना दिले. फोनवरूनच त्यांनी या मार्शल अधिकाऱ्यांचा समाचार घेतल्याचे देखील यावेळी पहायला मिळाले.

मास्क न घालता फिरणारे अनेक लोक हुज्जत घालत असतात. अशा लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हुज्जत घालून अरेरावी करणाऱ्या मार्शल विरोधात तक्रारी आल्यास अशा क्लिनअप मार्शलवरही कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक क्लिनअप मार्शलची आणि वॉर्डाची ओळख दर्शवणारा ठळक क्रमांक गणवेशावर देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनाही तक्रार करणे शक्य होणार आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.