नवविवाहित सूनेलाच घेऊन सासरा झाला फरार , पुन्हा गावी येताच ‘ असे ‘ स्वागत

देशात अनेक धक्कादायक घटना रोज उघडकीस येत असतात . समाजाच्या विरोधात जाऊन अनेक लग्न होतात मात्र त्यात देखील नाते चुकीचे असेल तर त्याची जोरदार चर्चा होते. अशीच एक बातमी समोर आली असून एका सासऱ्याचंच आपल्या सुनेवर प्रेम जडलं. इतकंच नाही तर स्वतःच्या मुलाला गुंगारा देत सासरा आपल्या सुनेला घेऊन पळूनही गेला. अर्थात सून देखील सासऱ्यावर प्रेम करत होती मात्र मुलगा बिचारा त्यांचा शोध घेत राहिला आणि काही वर्षांनी दोघंही आपल्यासोबत एक दोन वर्षांचं बाळ घेऊन पुन्हा घरी परतले.

इंडिया डॉट कॉमनं याबद्दल वृत्त दिले असून घटना उत्तर प्रदेशातील आहे. उत्तर प्रदेशच्या बदायूमधील बिसोली कोतवाली परिसरातील दबथरा गावातील असून महिलेच्या आधीच्या पतीनं आपल्या पत्नी आणि वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती . तक्रार दाखल झाल्यावर पंचायत बोलवण्यात आली. आणि सर्वांनी सासरे आणि सुनेच्या बाजूनेच निर्णय दिला. पंचायतीच्या म्हणण्यानुसार, महिलेचं लग्न जेव्हा तिच्या पहिल्या पतीसोबत झालं तेव्हा ती अल्पवयीन होती. पंचायतीच्या निर्णयानंतर महिलेनं पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला आणि सासऱ्यासोबत लग्न केलं.

उपलब्ध माहितीनुसार, महिला आणि तिच्या पहिल्या पतीचं लग्न 2016 मध्ये झालं होतं. मुलाच्या आईच एक वर्षांपूर्वीच लग्न झालेले असल्याने मुलगा आणि त्याच्या वडिलांच्या म्हणजे सासऱ्याच्या स्वयंपाकाची अडचण होती होती म्हणून हे लग्न करण्यात आले होते मात्र नवीन नवरी पाहून सासऱ्याची नियत फिरली आणि विशेष म्हणजे सुनेचे देखील सासऱ्यासोबत अफेसर सुरु झाले. मुलाला समजले तेव्हा ते फरार झाले होते. काही काळ गावाबाहेर राहिल्यावर जेव्हा ते पुन्हा गावी आले तेव्हा त्यांच्यासोबत एक वर्षाचे गोजिरवाणे बाळ देखील होते.

नवीन सून घरात येताच मुलासोबत लग्न केलेल्या सुनेवरच सासऱ्याचं प्रेम जडलं आणि त्यातून हा प्रकार घडला. सासऱ्याच्या प्रेमात पडलेल्या महिलेनं निर्णय घेतला की पतीसोबत घटस्फोट घेऊन ती सासऱ्यासोबत लग्नगाठ बांधेल. आपल्या सुनेसोबत लग्नगाठ बांधणाऱ्या व्यक्तीचं नाव देवानंद आहे. त्यांचं वय सुमारे 45 वर्ष आहे. लग्नानंतर सहा महिन्यांतच संबंधित महिला आणि तिच्या पतीच्या नात्यात दुरावा आला आणि यानंतर महिलेची आपल्या सासऱ्यासोबत जवळीक वाढली आणि ते दोघे फरार झाले.