आष्टी तालुक्यातील तागडखेल-सावरगाव परिसरात झाली ढगफुटी

आष्टी/बीड (प्रतिनिधी-गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यात काल सायंकाळपासून पाऊसास सुरुवात झाली होती, रात्रभर तालुक्यात संतत धार पाऊस झाला असून त्यामध्ये तालुक्यातील तागड खेल-सावरगाव परिसरात ढगफुटी झाल्याचे पहावयास मिळत आहे. या भागातील सर्व पिके पाण्यात गेले असून सर्व छोटे छोटे तलाव ओसंडून वाहत आहेत, तर तागड खेल येथील रस्त्यावरती पाऊस वाऱ्याने झाड कोसळल्याने रस्ता बंद झाल्याचे पहावयास मिळत आहे.

सावरगाव मच्छिंद्रनाथकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जे छोटे छोटे पुल आहेत, त्या पुलांच्या वरून पाणी वाहताना दिसत आहे, तर राजे वस्ती वरील तलाव हा पूर्ण क्षमतेने भरला असून ओसंडून वाहताना दिसत आहे. तरी या भागातील नदीकाठच्या/वाडी वस्ती वरील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, आपण आपल्या सर्व कुटुंबाला घेऊन सुरक्षित ठिकाणी थांबा, आपल्या सर्व कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक बीड जिल्हा सरचिटणीस शौकत पठाण यांनी केले आहे .