नगर तहसीलमधील ‘ त्या ‘ बोर्डची चर्चा तर होणारच, इतरांनी अनुकरण करण्याची गरज

शेअर करा

देशातील नागरिकांचे रक्षण व्हावे म्हणून सीमेवरील सैन्य ऊन वारा पाऊस बर्फ अशा कुठल्याही परिस्थितीत सतत तत्पर असते मात्र सैन्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या बदल्या झाल्यास नवीन शहरात आल्यानंतर कुटुंबास अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी भाषेची अडचण येते तर काही ठिकाणी शहर नवीन असल्याने शहराची माहिती नसते. शासकीय पातळीवर देखील अनेक ठिकाणी अशा परिवारांना अडचणींचा सामना करावा लागतो , या पार्श्वभूमीवर नगर तहसीलमध्ये तहसीलदार उमेश पाटील यांच्या नावाने लावलेला बोर्ड सर्वांचे लक्ष वेधून घेत असून शहरासह तालुक्यात या बोर्डची मोठी चर्चा आहे .

काय आहे बोर्डवरील मजकूर ?

‘ भारतीय सैन्य दलात कार्यरत व निवृत्त असणाऱ्या जवानांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांचे तहसील कार्यालयात काही शासकीय काम असल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. आपले काम प्राधान्याने करणे मी माझी नैतिक जबाबदारी समजतो. देशसेवेसाठी आपण कार्य करत असल्याचा व केल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे , आपलाच उमेश पाटील ‘

तहसील कर्मचाऱ्याशी नगर चौफेर प्रतिनिधीने संवाद साधला असता गेल्या ५ दिवसापासून हा बोर्ड लावण्यात आला असून सैन्यातील परिवारांच्या अडचणींची जाणीव ठेवून त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने लावलेला हा बोर्ड नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरला आहे . इतर तालुक्यातील देखील अधिकाऱ्यांनी सैन्यातील परिवाराच्या अडचणी समजून त्यांना मदत करण्यास प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


शेअर करा