अल्पवयीन मुलीला १८ वर्षीय दाखवण्यासाठी तरुणाकडून नीचपणाचा कळस , आईनेही दिली साथ

शेअर करा

अल्पवयीन मुलीला पळवले खरे मात्र पोलीस मागावर असल्याने तो तरुण एका पाठोपाठ एक असे अनेक गुन्हे करत केला मात्र अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच . घटना जळगावची असून सदर तरुणास अटक करण्यात आली असून या प्रकरणी त्याला साथ देणारी त्याची आई आणि त्याच्या भावालादेखील अटक करण्यात आली आहे . 21 वर्षाच्या तरुणाने 14 वर्षाच्या मुलीला पळवून नेले. तिचे वय 18 दाखवणारा खोटा दाखला जोडून लग्न केल्याची कागदपत्रे देखील तयार केली. पोलिसांनी अडवले तर मुलीच्या हाती दुसऱ्याचे बाळ घेऊन आम्हाला बाळ झाल्याचे देखील दाखवले मात्र इतक्या सगळ्या खोटेपणाचा अखेर जळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे .

उपलब्ध वृत्तानुसार, सदर तरुणाचे नाव भारत राजा चावरे असे असून तो अमरावती येथील आहे आहे. जळगाव शहरात मामाकडे राहत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला त्याने पळून नेले. पळून गेल्यानंतर कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून लग्न केल्याचे कागदपत्र देखील त्याने तयार केली तरीदेखील आपण पुन्हा अडचणीत येऊ नये म्हणून त्या मुलीच्या हातात दुसऱ्याचे बाळ घेऊन आम्हाला एक मूल झाले आहे, असा देखील त्याने बनाव निर्माण केला होता मात्र जळगाव पोलिसांनी त्याच्या या कृत्याचा भांडाफोड केला आहे

सदर कृत्यात त्याला मदत करणाऱ्या भावाला आणि आईला देखील अटक केली आहे. तपास सुरू असताना भारत याने पीडित मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कार, बाललैंगिक अत्याचार कलम देखील वाढवण्यात आले आहे. कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून बनावट दस्तऐवज तयार केला म्हणून फसवणुकीचे 420 व अल्पवयीन मुलीशी लग्न केले म्हणून बालविवाह कायद्याचे देखील कलम वाढवण्यात येणार आहे. अटकेतील तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे .


शेअर करा