.. अन अखेर तारकपूर बस स्टँडवरून पास मिळण्याचा मार्ग मोकळा

शेअर करा

प्रतिनिधी गोरख मोरे यांचेकडून : नगर शहरातील विभागीय नियंत्रक कार्यालय तारकपूर येथून गेल्या काही महिन्यापासून शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पास मिळत नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्याचे आर्थीक नुकसान होत होते. तारकपूर आगार प्रमुखाकडे पास देण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नव्हते, त्यानंतर बारा बलुतेदार महासंघ व जनहित सामाजिक प्रतिष्ठान चिचोंडी पाटील यांच्या वतीने तारकपूर अहमदनगर आगार यांना निवेदन देवून चर्चा करण्यात आली. बारा बलुतेदार महासंघ व सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिलेल्या निवेदनाची दखल घेत दिनांक 01/09/2021 पासून विद्यार्थी सवलत पास देण्यासाठी संबंधित कर्मचारी देऊन पास सुरू करण्यात येतील असे सांगितले.

नगर तालुक्यातील ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक (एस टी)पास घ्यायचा असेल त्यांनी तारकपूर बस डेपो या ठिकाणाहून पास काढून घ्यावा, अशी विनंती बारा बलुतेदार महासंघ व सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी निवेदन देताना बारा बलुतेदार महासंघ तालुकाध्यक्ष प्रकाश दादा जाधव व सरचिटणीस व जनहित सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष दिपक (भाऊ )कांबळे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक शंकर जगताप साहेब प्रतिष्ठान चे खजिनदार महेश वाटाडे ,शंकर सरोदे शिवाजी थोरात, रवींद्र सदाफुले, दत्ताञय जटाडे हे यावेळी उपस्थित होते.


शेअर करा