लग्नासाठी जर स्थळ पसंत नसेल तर नकार देण्यात काहीच गैर नाही आणि आणि ज्यांना नकार दिलाय त्यांनी देखील त्यात वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही मात्र यावरून दोन शेजारी कुटुंबात चक्क हाणामारी होऊन मुलीच्या काकाला जीव गमवावा लागला तर वडील देखील गंभीर जखमी झाले आहेत हा धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव तालुक्यातील जामोद इथे 31 ऑगस्ट रोजी घडला आहे .
उपलब्ध वृत्तानुसार, जामोद येथे जैन मंदिर परिसरात राहणारे शेख नजीर शेख कादिर ( वय ४५ ) यांचा मुलगा शेख जुबेर शेख नजीर ( वय 18 ) याच्यासाठी शेजारी रहात असलेल्या रसूलखान समशेर खान यांच्या मुलीसाठी मागणी घातली होती मात्र मुलीचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असल्याने मुलाच्या कुटुंबाचा प्रस्ताव मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता त्यामुळे त्यांच्यात सहमती बनत नव्हती.
याप्रकरणी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी मंगळवारी एकत्र बसलेल्या दोन कुटुंबात पुन्हा वाद उफाळून आला आणि आणि सरळ मारामारीला सुरुवात झाली. यामध्ये मुलीचा काका नूर खान समशेर खान ( वय ३३ ) यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला गेल्याने ते जागीच ठार झाले तर मुलीचे वडील रसूल खान समशेर खान हेदेखील गंभीर जखमी झाले आहेत.