सुमित शिर्के आत्महत्या प्रकरण : आधी हनीट्रॅप मग ऍट्रॉसिटीची धमकी त्यानेही बधला नाही तर …

शेअर करा

अकोले प्रतिनिधी ललित मुतडक:- अकोले तालक्यातील कळस बुद्रुक येथील सुमित मंगेश शिर्के या सिव्हील इंजिनिअरने गळफास लावून नुकतीच आत्महत्या केली होती.मयत सुमितच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील दोन महिलांवर आज अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत सुमित मंगेश शिर्के याचे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील रेखा नंदू वाकचौरे या महिलेच्या मुलीशी प्रेमसंबंध होते.या दोघांचे पाच ते सहा महिने प्रेमसंबंध सुरू राहिल्यानंतर या प्रेम प्रकरणातील मुलीने व तिच्या आईने सुमितकडे पैशासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली होती.सुमित हा सिव्हील इंजिनिअर होता.मात्र कोरोना काळात त्याचे हातचे काम गेले होते. त्यामुळे त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते.मोठा भाऊ व त्याची आई देईल तेवढेच मोजके पैसे त्याच्याकडे असत.त्यातच आपली प्रेमिका व तिची आई पैशासाठी सातत्याने तगादा लावत असल्याने तो मानसिक तणावाखाली होता.हजार दोन हजार रुपये त्याने अनेकदा आपल्या प्रेमिकेला व तिच्या आईला दिले.मात्र त्यांची पैशाची भूक जास्तच वाढत गेल्याने सुमितचे टेन्शन वाढले होते.

८ ऑगस्ट रोजी रेखा वाकचौरे ही प्रेमिकेची आई कळस बुद्रुक येथे त्याच्या घरी आली.यावेळी तिने त्याच्याकडे व त्याच्या आईकडे ५० हजार रुपयांची मागणी केली.मात्र सुमितकडे व त्याच्या आईकडे एवढी रक्कम नसल्याने रेखा वाकचौरे हिने दोघांनाहि अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.तुम्ही जर मला पैसे दिले नाहीतर तुम्हाला कोर्ट कचेऱ्या करायला लावील,अशी धमकी तिने दिल्याने, सुमित हा खूपच मानसिक तणावाखाली गेला.आपल्या घरी येऊन राडा घातल्याने सुमितच्या पायाखालची वाळू सरकली होती.आता एव्हढे पैसे आणायचे कुठून हा यक्षप्रश्न त्याच्या पुढे आ वासून उभा होता.आपल्या मोठ्या भावाकडून इतकी मोठी रक्कम तो मागू शकत नसल्याने तो खूपच मानसिक तणावाखाली होता.

सोमवार दि.९ ऑगस्ट रोजी सुमितची आई नेहमीप्रमणे सकाळी ९ वाजता सुगाव येथील नर्सरीत कामासाठी गेली.यावेळी सुमित हा घरी एकटाच होता.गावातून फेरफटका मारून आल्यानंतर तो आपल्या घराचे दार लावून बंद करून बसला होता.यावेळी दुपारच्या सुमारास सुमितचे व त्याच्या प्रेयसीचे व्हॉट्सॲपला बोलणे सुरू होते.यावेळी त्याच्या प्रेयसीने त्याच्याकडे पैशाची मागणी केली.तसेच तू आज काही करून मला पैसे पाठव अन्यथा मला दुसरा निर्णय घ्यावा लागेल,अशी धमकी तिने सुमितला दिली.त्यातच प्रेयसीने तिच्या घराशेजारील विहिरीचे फोटो काढून त्याला पाठविले.तू जर मला पैसे पाठविले नाही तर मी या विहिरीत उडी मारून जीव देईल,अशी धमकी देखील दिल्याने सुमित खूपच गरबडून गेला.

सुमितने मागचा पुढचा विचार न करता त्याने आपल्या घरातील टिव्हीचा आवाज मोठा करीत घरातील आध्याला दावे बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.हा प्रकार सुमितची आई घरी आल्यानंतर उघडकीस आला. त्यामुळे माझ्या मुलाच्या मृत्यूला रेखा नंदू वाकचौरे व तिची मुलगीच कारणीभूत असल्याचे निषपन्न झाले होते.मात्र प्रकृतीच्या कारणास्तव आज अकोले पोलीस ठाण्यात उशिरा फिर्याद दाखल करण्यात आली.

अकोले पोलीस ठाण्यात सविता मंगेश शिर्के यांच्या फिर्यादीवरून रेखा नंदू वाकचौरे व तिच्या मुलीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहे.उशिरा का होईना या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सध्या नगर जिल्ह्यात नागरिकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट झाला आहे.मयत सुमितची आत्महत्या हा देखील त्यातलाच एक प्रकार आहे.यापूर्वी एपीआय मिथुन घुगे यांनी हनीट्रॅप प्रकरणात संगमनेर शहरातील सपना शिंदे या महिलेच्या मुसक्या आवळल्या होत्या.त्याच पदधतीने रेखा वाकचौरे या महिलेला देखील तात्काळ ताब्यात घ्यावे,अशी मागणी अकोले तालुक्यातील सजग नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

सदर प्रकरणातील रेखा वाकचौरे या आरोपी महिलेचा भाऊ एका सायं दैनिकाचा पत्रकार असून तो आपल्या बहिणीला पाठीशी घालून,असे काळे कृत्य करत होता तसेच त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील द्यायचा.त्यामुळे या पत्रकार भावावर देखील पोलीसांनी कारवाई करणे गरजेची असल्याचे नागरिकांचे मत आहे . मूठभर लोकांच्या पैश्याच्या हव्यासापोटी पूर्ण पेशा बदनाम होत असल्याने या पत्रकारावर देखील कारवाई होणे गरजेचे आहे.


शेअर करा