व्हिडीओ: ट्रॅफिकमध्ये नवरा परस्त्रीच्या गाडीत दिसला..बायकोने बोनेटवर चढून चपलेने धुतला : महाराष्ट्रातील घटना

शेअर करा

काही ठिकाणी लॉकडाऊन तर काही ठिकाणी कोणती बंधने नाहीत. काही ठिकाणी कंटेन्टमेंट झोन तर काही ठिकाणी बफर झोन यामुळे देशात सध्या प्रेमी युगुलांचे आणि विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्यांचे कमालीचे हाल होत आहेत. अशातच मुंबईमध्ये एका महिलेने आपल्या पतीला मुंबईत ऐन ट्राफिकमध्ये दुसऱ्या एका परस्त्रीसोबत पहिले आणि भर रस्त्यातच तिने चांगलाच हंगाम केला . तिचे हे रूप पाहून ट्रॅफिक पोलीस देखील काही काळ हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.

उपलब्ध माहितीनुसार, हाजी अलीपासून काही मीटर अंतरावरील पेडर रोडजवळील पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली. या व्हिडीओत ती महिला, तिचा पती आणि त्याची प्रेयसी दिसत आहे. पतीला परस्त्रीसोबत पाहिल्यानंतर पत्नीचा राग अनावर झाला आणि नवऱ्याला मारता येत नसल्याने तिने बोनेटवर चढून मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात तिला यश आले नाही. नंतर पोलिसांनी ती गाडी पुढे घ्यायला सांगितली.

गाडी पुढे घेतल्यानंतर तिने नवऱ्याला त्या गाडीबाहेर काढून धुतले मात्र पहिल्या गाडीत बसलेली त्याची प्रेयसी अजून बाकी होती. तिने पुन्हा एकदा तिची गाडी पार्क केली आणि पुढे पळत जाऊन प्रेयसीला चांगलीच मारहाण केली. एकंदरीत दोन्ही गाड्या पाहता हे उच्चभ्रू कुटुंब दिसते आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा सर्व प्रकार आज घडल्याची चर्चा आहे मात्र तक्रार याबद्दल तक्रार दाखल न झाल्याने अधिकृत कोणती माहिती समोर आलेली नाही. या सर्व प्रकारानंतर गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्या महिलेची विचारपूसही केली .मुंबईतील वर्दळीच्या रस्त्यावर हा सगळ्या हंगामा झाल्यानंतर त्या दोन्ही गाड्यांवर ट्राफिक पोलिसांनी कारवाई केली आहे.

मोटर वाहतूक अधिनियम 122 म्हणजे रस्त्यावर अडथळा निर्माण करुन ट्राफिक जॅम करण्याबद्दल ई-चालान करण्यात आलं आहे. तसेच याबाबतची पुढील कारवाई ही स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती डीसीपी वाहतूक शहर पोलिसांनी दिली आहे.


शेअर करा