नागपुरातील बोधी निवासातील महिलेच्या ‘ त्या ‘ खूनाबाबत वेगळाच अँगल समोर

शेअर करा

नागपूर इथे एका बौद्ध भिक्खूने त्याच्या सोबत राहणाऱ्या महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर इथे उघडकीस आली होती . पोलीस तपास सुरु असतानाच हा प्रकार पवित्र नात्याला आधी काळिम्बा फासला आणि त्यानंतर आपली प्रेयसी असलेल्या महिलेचे दुसरीकडे सूत जुळल्याने चिडून राग अनावर होऊन त्यातून घडल्याचे समोर आले आहे . टीव्ही ९ मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. बारा वर्षांपूर्वी महिलेसोबत आरोपी शिष्याचे महिलेसोबत प्रेम संबंध निर्माण झाले होते मात्र मागील बारा वर्षांपासून संबंध असलेल्या महिलेने दुसरीकडे सूत जुळवले त्यामुळे चिडलेल्या शिष्याने तिचा खून केल्याची परिसरात चर्चा आहे.

काय आहे प्रकरण ?

नागपूरच्या दहेगाव इथं असलेल्या शिवली बोधी भिक्खु निवासात ही घटना घडली होती . श्रामनेरी बौद्धप्रिया असं मृत महिला भिक्खुचं नाव आहे तर भदंत धम्मानंद थेरा असे आरोपीचे नाव आहे. आरोपी भदंत धम्मानंद थेरा देखील याच निवासात राहत होता मात्र दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होत होते मात्र त्याचे पर्यवसान इतके गंभीर होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

२९ तारखेला पुन्हा एकदा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरु झाले आणि काही वेळातच भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे रागाच्या भरात भदंत धम्मानंद याने चाकू आणि लोखंडी रॉडने श्रामनेरी बौद्धप्रिया यांच्यावर वार केले. चाकूचे वर्मी घाव बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन श्रामनेरी बौद्धप्रिया यांचा जागेवरच मृत्यू झाला होता .

सदर घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी भिक्खु निवासाकडे धाव घेतली असता घटनास्थळी श्रामनेरी बौद्धप्रिया यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. घटनास्थळावर चाकू आणि लोखंडी रॉड पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा असून श्रामनेरी बौद्धप्रिया यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे तर आरोपी भदंत धम्मानंद याला अटक केली आहे.


शेअर करा