अमृता फडणवीस यांचं बहुचर्चित ‘ नवं गाणं ‘ अखेर रिलीज

शेअर करा

सातत्याने आपल्या सुमधुर आवाजाने चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या तसेच राजकीय शेरेबाजीमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं रिलीज झाले आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने त्यानिमित्ताने हे लाँच करण्यात आले असून त्यांच्या या गाण्यास उत्तम प्रतिसाद देखील मिळतो आहे .

अमृता फडणवीस यांच्या आवाजातील गणेश वंदनेचा व्हिडीओ रिलीज करण्यात आला असून अमृता फडणवीस चक्क पारंपरिक मराठमोळ्या वेशभुषेत पाहायला मिळत आहेत. टाइम्स म्युझिक हब कंपनीच्या माध्यामातून हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या समोर आला आहे. ‘ या व्हीडिओसाठी मी खूप उत्सुक होते. हा व्हीडिओ जसा मला कनेक्ट झाला आहे, तसा तुम्हालाही होईल ‘, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

‘ तिला जगू द्या ‘ हे त्यांचे गाणे चांगलेच हिट ठरले होते त्यानंतरही अमृता फडणवीस यांची इतरही गाणी प्रदर्शित झाली. महिला दिनाच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन , ‘ काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा ‘ असे म्हटले होते .


शेअर करा