इंस्टाग्रामवरच्या प्रगतीनंतर आता ‘ तन्वयी ‘ चे तसले कारनामे उघड झाल्याने पोलिसही हैराण

शेअर करा

हातामध्ये कॅमेरा फोन आल्यापासून आणि व्हिडीओ रेकॉर्ड सहजासहजी करता येत असल्याने गेल्या काही वर्षांपासून हनीट्रॅप, ब्लॅकमेलिंगच्या अनेक घटना समोर येत आहे.बदनामीच्या भीतीनं अनेकजण दबावाला बळी पडून त्यांना पैसे देत असल्याने आरोपींचे देखील फावते आहे. नागपूरात देखील हनीट्रॅपची अशीच एक घटना समोर आली आहे मात्र शिकार झालेल्या मुलाचे वडील हे शिकाऱ्यांपेक्षा जास्त चतुर निघाल्याने आरोपींना जेलची हवा खावी लागली आहे .

काय आहे प्रकरण ?

नागपूर येथील रहिवासी असलेल्या पीडित तरुणाला तन्वयी नावाच्या मुलीनं इन्स्टाग्रामवर फॉलो रिक्वेस्ट पाठवली होती. पीडित तरुणानं संबंधित रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर दोघांत बोलणं सुरू झालं. दोघांनी एकमेकांचे व्हॉट्सअॅपनंबर देखील एकमेकांना दिले. यानंतर व्हॉट्सअॅपवरही दोघांचं बोलणं सुरू झाल . पुढे व्हाट्सएप्पवर दोघांत अश्लील बोलणे देखील सुरु झाले आणि तन्वयीनं पीडित तरुणाकडे न्यूड फोटोची मागणी केली.

तन्वयीच्या नादात पागल झालेला पीडित तरुण नाही म्हणू शकला नाही आणि त्याने त्याचे तसे फोटो तिला पाठवले. काही दिवसांनी एका अज्ञात नंबरवरून पीडित तरुणाला फोन आला त्यात ,’ तुझे अश्लील फोटो आमच्याकडे आहेत. बदनामी टाळायची असेल तर दीड हजार रुपये दे ‘, अशी मागणी केली. आरोपीच्या धमकीला घाबरून पीडित तरुणानं दीड हजार रुपये लगेच देऊन टाकले. पुढे पुन्हा पाच हजार रुपये मागण्यात आले, ते देखील या तरुणाने देऊन टाकले. आरोपीनं पुन्हा साडेसहा हजार रुपये मागितले ते देखील या तरुणाने दिले.

सततच पैशासाठी त्याला अशा स्वरूपाचे फोन येत असल्याने अखेर मुलाने वडिलांना विश्वासात घेऊन ही घटना सांगितली . वडिलांनी या मुलाला असल्या धमक्यांना भीक न घालण्याचा सल्ला दिला .पैसे मिळतच नसल्याने अखेर आरोपीनं घरी येऊन पीडित तरुणाच्या वडिलांना आणि काकांना न्यूड फोटो दाखवले आणि ‘ तुमचा मुलगा माझ्या नात्यातील तरुणीला त्रास देतो ‘, असा दावा देखील करत त्याला जेलमध्ये घालण्याची देखील धमकी दिली आणि प्रकरण मिटवायचं असेल तर 50 हजार रुपये द्या, अशी मागणी केली. वडिलांनीही त्याला पैसे द्यायचं मान्य केलं मात्र वडिलांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजत होता.

वडिलांनी आरोपीला पैसे घेऊन जाण्यासाठी एका मंगल कार्यालयात बोलवलं खर मात्र तत्पूर्वी वडिलांनी याची माहिती पोलिसांना देऊन ठेवली होती. आरोपी तरुण पैसे घ्यायला येताच साध्या वेशात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या . रौनक प्रभू वैद्य असं आरोपीचं नाव असून तो नागपुरातील हुडकेश्वरमधील पिपळा फाटा भागात राहतो. रौनक प्रभू वैद्य याने अशाच प्रकारे इतर कोणाला फसवले आहे का ? याचाही पोलीस शोध घेत असून सदर व्यक्तीने आणखी कोणाची फसवणूक केली असेल तर नागरिकांनी न भिता पुढे यावे , असे आवाहन देखील केले आहे .


शेअर करा