नगरमध्ये कंटेन्टमेंट झोन वाढणार की पुन्हा लॉकडाऊन ? ‘ ह्या ‘ विभागाची महापालिकेकडून पाहणी

शेअर करा

छायाचित्र संग्रहित

नगर महापालिकेच्या हद्दीत करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आता कंटेन्मेंट झोन वाढवण्यावर किंवा पूर्ण शहर लॉकडाऊन करण्यावर प्रशासनाचा भर राहण्याची चिन्हे आहेत. नगर जिल्ह्यामध्ये काल एकाच दिवशी तब्बल ९० करोना बाधीत वाढले आहेत. यामधील नगर शहरातील बाधितांची संख्या तब्बल ६२ इतकी आहे.

सध्याच्या परिस्थितीत निम्मे नगर शहर लॉकडाऊन झाले आहे. याशिवाय आज लक्ष्मीकारंजा व सावेडीतील भिस्तबाग चौक परिसरात महापालिकेच्या पथकांना पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे ह्या विभागात देखील कंटेन्मेंट झोन करण्याबाबत विचार सुरू आहे. नगर ग्रामीण काय शहर काय सगळीकडेच पेशंट वाढत आहेत . पेशंट वाढीचा हा ट्रेंड असाच कायम राहिल्यास, येत्या दोन दिवसात संपूर्ण नगरच लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय घ्यायचा का ? याबद्दल विचार सुरु असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली आहे.

शहरात लॉकडाऊन वाढल्यास पुन्हा एका सर्व नगरकरांना घरातच राहावे लागण्याची वेळ येणार आहे. लॉकडाऊन लावून तपासण्या वाढवण्याकडे प्रशासनानाला भर द्यावा लागणार आहे. शहरात काही ठिकाणी बफर झोन काही ठिकाणी कंटेन्टमेंट झोन शिवाय जिल्हाबंदी यामुळे शहराचे अर्थकारण पूर्णपणे थांबलेले असून गोरगरिबांचे आणि हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत त्यात भर म्हणून सरकारकडून रोज नवीन नवीन गाईडलाईन्स येत असल्याने नागरिक देखील गोंधळल्याचे चित्र आहे .


शेअर करा