दहा वर्षांपासून ‘ तसल्या ‘ संबंधाची लागली होती चटक , नात्याच्या सर्व मर्यादा केल्या पार

विवाहित महिलेसोबत तसले संबंध ठेवत आरोपीने चक्क तिच्या तीन अल्पवयीन मुलींवर देखील अत्याचार केल्याप्रकरणी लातूरच्या विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला दहा वर्षांचा कारावास व बाराशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्यात १८ नोव्हेंबर 2019 रोजी अल्पवयीन पीडित मुलीने तक्रार दाखल केली होती.

उपलब्ध तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलीची आई व तिच्या आत्याचा नवरा चंद्रकांत वागलगावे हे 2007 ते 2017 दहा वर्षांपासून लग्न न करता स्वखुशीने नवरा-बायकोसारखे राहत होते. याच दरम्यान आरोपी चंद्रकांत याने महिलेच्या पीडित मुलीवर अत्याचार केला तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास सर्वांनाच जीवे मारीन अशी धमकी देखील त्याने दिली, त्यामुळे पीडिता गप्प राहिली. त्यानंतर त्याला जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केले.

काही कालावधी जाताच त्याने पीडित मुलीच्या लहान बहीण सोबत देखील अत्याचार केल्याचे उघड झाले. त्यानंतर पीडित मुलीने गांधी चौक पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली. गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले. त्यातील पीडितेची आई, दोन बहिणींची साक्ष, पीडित अल्पवयीन असल्याबाबतचा पुरावा साक्ष धरून आरोपीस शिक्षा ठोठावण्यात आली आहे.