पुणे हादरलं..अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार , ८ जण ताब्यात

शेअर करा

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढलेले पाहायला मिळत असताना एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची प्रचंड संतापजनक घटना समोर आल्यावर पुरोगामी महाराष्ट्राची नेमकी वाटचाल आता कोणत्या दिशेला होतेय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे .

काय आहे प्रकरण ?

पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 8 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पीडितेने याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित घटना ही 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती पीडित मुलीने दिली आहे.

पुण्यासारख्या जिल्ह्यात या अशाप्रकारच्या घटना घडत असतील तर इतर भागांत तर गुन्हेगारांचा नंगानाचच सुरु आहे असे म्हणता येईल. आरोपी अवघ्या 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करतात त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करतात तोपर्यंत पोलीस प्रशासन नेमकं कुठे गेलं होतं ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोपींच्या मनात पोलिसांप्रती असलेली भीती राहिलेली नाही. त्यातूनच या अशा घटना उघडकीस येताना दिसत आहेत, असं मत आता स्थानिकांकडून व्यक्त केलं जात आहे .

अवघ्या दहा दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड येथून दोन सराईत बाल गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलीवर वांरवार सामूहिक बलात्कार केला होता. आरोपींनी पीडितेवर अत्याचार करताना मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर ते मुलीला तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी द्यायचे. अशाच प्रकारची धमकी देवून त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीवर अनेकदा सामूहिक बलात्कार केला होता.


शेअर करा