बिंदुसरा धरणाजवळ जीव धोक्यात घालून सेल्फी , जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरक्षा रक्षकाची मागणी

शेअर करा

बीड प्रतिनिधी गोरख मोरे यांचेकडून : मुसळधार पावसाने नदीनाल्या तुडुंब भरून वाहील्याने बिंदुसरा धरण 100 टक्के भरले असून सांडव्याच्या लहान चादरी बरोबरच मोठ्या चादरी वरून पाणी ओसंडुन वाहत असताना दररोज पाण्याच्या पातळीत वाढ होत असताना त्याठीकाणी पर्यटकांची गर्दी होत असून फोटो काढण्यासाठी लोखंडी पुलावरून धरणाच्या मुख्य भिंतीवर जात आहेत त्याच बरोबर धरणाच्या मुख्य भिंतीच्याखाली वावरताना दिसत असून त्यांचा जीव धोक्यात घातल्याची त्यांना जाणिव दिसत नाही.

धरणाच्या सांडव्याशेजारी धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील कडेला सावधान प्रतिबंधित क्षेत्र असा फलक असताना त्यावर बिंदुसरा धरणाच्या सांडव्याची व धरणातील पाण्याची खोली जास्त असल्यामुळे भिंतीवर जाणे, खाली डोकावणे आणि पोहणे धोक्याचे आहे, काही अपघात, दुर्घटना अथवा जिवितहानी झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार नाही, कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 3 बीड आदेशावरून असा फलक आहे.

नागरीकांनी जबाबदारीनं वागलं तर पाहीजेच परंतु त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक सुद्धा असायलाच हवेत अन्यथा दुर्घटना घडु शकते त्यामुळेच जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक बीड तसेच कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग बीड यांना सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी ईमेल द्वारे निवेदन दिले आहे


शेअर करा