‘ मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत हे तपासावे लागेल ‘ काँग्रेसकडून भागवतांवर टीका

शेअर करा

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू असो वा मुस्लिम सर्वांचा डीएनए एकच असल्याचं विधान केलं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरमरीत टीका केली असून ‘ मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत हे तपासावे लागेल ‘ असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

नाना पटोले यावेळी म्हणाले, ‘ मोहन भागवत कुठले डॅाक्टर आहेत ते तपासावे लागेल, संविधानात समभावाची भावना विशद करण्यात आली आहे. सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसने मांडली आहे. रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा सर्व धर्म समभाव असं मोहन भागवत बोलले असते तर त्याचं स्वागत केलं असतं ‘ , असा टोलाही पटोले यांनी लगावला.

मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात हिंदू असो वा मुस्लिम असो सर्वांचं डीएनए एकच असल्याचं म्हटलं होत. प्रत्येक भारतीय हा हिंदू आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील विद्वानांनी कट्टरपंथीयांविरोधात उभं राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले होते. तसेच ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करून त्यांच्यात भांडणं लावली. मुस्लिम कट्टरपंथीय असल्याचं हिंदूंना सांगून ब्रिटिशांनी भांडणं लावली. त्यातच दोन्ही समाजात एकमेकांवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे त्यांनी कधीच एकमेकांसमोर आपलं म्हणणं मांडलं नाही. म्हणून दोन्ही समाजात अंतर निर्माण झालं. आता आपण आपला दृष्टीकोण बदलला पाहिजे, असं भागवत म्हणाले होते.


शेअर करा