मुर्शदपूरमध्ये रस्त्यावर घाणीच्या पाण्यामुळे लोकांच्या मनात ‘ वेगळीच ‘ भीती

आष्टी । प्रतिनिधी: सध्याच्या परिस्थितीत नागरिक कोवीड १९ च्या दहशतीत असताना वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. मागील काही दिवसांपासून चिकनगुनीया सर्दी , ताप ,टायफाईड , मलेरिया साथीच्या रोगाने नागरीक झाले हैराण झाले आहेत.मुर्शदपुर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे . वातावरणाच्या बदलांमुळे साथ रुग्णांचे प्रमाण वाढले असून अनेकांना अशी भिती वाटत आहे की आपणाला कोरोना तर झाला नसावा ? अशी भीती प्रत्येकांच्या मनात घर करीत आहे.

काही रुग्ण आजार अंगावर काढत असून दवाखान्यात जायला भीती दर्शवतात , साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.खाजगी रुग्णालयात फुल भरलेले चित्र पहावयास मिळत आहे . आज या बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयी चिकन गुनीया , ताप , खोकला , सर्दी , डेंगू , मलेरिया , टायफॉईड , पांढरे पेशी कमी होणे , अशा आजाराने त्रस आहेत . या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी ग्रामपंचायत साफसफाई व स्वच्छ पाणी सोडणे , लिक्विड फवारणी करून घेणे व शहरातील नागरिकांना या कोवीड १९ च्या भितीमध्ये साथीच्या रोगांच्या पासून वाचवावे असे मुर्शदपूर शहरातील नागरिक बोलत आहेत .