प्रेयसीच्या ‘ तसल्या ‘ सवयीला वैतागून केला खून , फक्त तीन शब्दात सगळी स्टोरी उघडकीस

शेअर करा

सतत दारु पिण्याचे व्यसन लागलेल्या प्रेयसीचे इतर व्यक्तींसोबत देखील संबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशात उघडकीस आली असून प्रियकराचा तिच्यावर राग इतका होता की, तिचा मृत्यू झाल्यावर त्याने तिच्या मृतदेहाची विटंबना देखील केली तसेच तिच्या मृतदेहाच्या कपाळावर ‘ प्यार मे धोका ‘ असे लिहलेला कागद तिच्या कपाळाला चिटकवला .

उपलब्ध माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील जबलपूरमध्ये राहणाऱ्या शालिनी जैन नावाच्या 24 वर्षांच्या तरुणीचे तिच्यापेक्षा वयानं दुप्पट असलेल्या पेपर वाटण्याचे काम करत असलेल्या घरमालक पप्पू गढवालसोबत प्रेमसंबंध होते मात्र त्याचवेळी शालिनी तिच्याच वयातील इतर व्यक्तीसोबतदेखील असेच संबध ठेवत असल्याचा त्याचा संशय होता. शालिनीला दारू पिण्याचे प्रचंड व्यसन होते आणि त्यामुळे ती पप्पूकडे वारंवार दारूची मागणी करायची आणि पप्पू तिची मागणी पूर्ण करत असे . दुसरीकडे शालिनी जबलपूर येथील मानव तस्करीच्या रॅकेटमधील मुख्य साक्षीदार होती त्यामुळे तिच्या मृत्यूने अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत.

शालिनी ही पप्पूकडून प्रत्येक भेटीत काही पैसे मागून घेत असे आणि आपल्या आईला नेऊन देत असे. गेल्या आठवड्यात पप्पू नेहमीप्रमाणे दारूची बाटली घेऊन तिला भेटायला गेला. दारू प्यायल्यानंतर नशेत असताना शालिनीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याने तिला पैसे दिले मग ती ते पैसे आईला देऊन परत पप्पूकडे आली. रात्री एकत्र जेवण करायचं ठरल्यानंतर पप्पूने दोघांसाठी स्वयंपाक केला.

दारूच्या नशेत असणारी शालिनी संध्याकाळीच झोपी गेली त्यानंतर रात्री पप्पूने दगड आणून तिच्यावर तिचे डोके आपटायला सुरुवात केली. काही वेळातच ती बेशुद्ध झाली. तिचा जीव जाईपर्यंत त्याने तिचे डोके दगडावर आपटले. त्यानंतर ‘प्यार मे धोका’ असं लिहिलेला कागद तिच्या रक्तबंबाळ कपाळावर लावला. खून झाल्यानंतर पप्पू घटनास्थळावरून फरार झाला. काही दिवसांनी शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांना ह्या घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी पप्पूला अटक केली आहे .


शेअर करा