महाराष्ट्र हादरला..’ पाच की दहा ? ‘ त्या ‘ वृद्धाच्या हत्येचे कारण ऐकून पोलिसही हैराण

शेअर करा

देशात गुन्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेत नाही अशातच महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून नवी मुंबई येथील एका ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या हत्येचे कारण समोर आल्यावर पोलीस देखील हैराण झाले आहेत. शमाकांत तुकाराम नाईक असे या मृत व्यक्तीचे नाव असून एका 33 वर्षीय व्यक्तीवर या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. नाईक यांनी कथितरित्या सदर तरुणाच्या पत्नीला १० हजार रुपये ऑफर करून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती, असं सांगितलं जात आहे. त्यातून संतापलेल्या तरुणाने त्यांचा खून केला अशी माहिती समोर आली आहे .

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या हवाल्यानं हिंदुस्तान टाइम्स या घटनेचं वृत्त दिले असून, शमाकांत तुकाराम नाईक यांच्या नावावर दुकाने, फ्लॅट आणि प्लॉटसह कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. मृत वृद्ध नाईक 33 वर्षीय आरोपीच्या दुकानात अनेक वेळा जात असे. त्यातून त्याने याआधी देखील ५ हजार रुपयांच्या मोबदल्यात तरुणाकडे त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती त्याला नकार मिळाल्यानंतर काही काळ तो शांत राहिला.

नाईक याच्या मनातली इच्छा काही जात नसल्याने त्याने पुन्हा एकदा 29 ऑगस्टला आरोपी युवकाला 10 हजार रुपये देऊ करत त्याच्या पत्नीला गोडाऊनमध्ये पाठवण्यास सांगितले. संतापलेल्या पतीने नाईक यास याबद्दल जाब विचारला व त्यातून त्यांची वादावादी झाली. मारामारी सुरु झाल्यावर आरोपीनं नाईकला ढकलून दिलं त्यामुळे डोक्याला दुखापत झाली. आरोपीनं तत्काळ दुकानाचे शटर खाली पाडले आणि त्यानंतर नाईकचा गळा दाबून खून केला. खून झाल्यानंतर आरोपीने नाईक याचा मृतदेह बाथरूममध्ये मृतदेह लपवून ठेवला.

31 ऑगस्टपर्यंत नाईकचा मृतदेह शौचालयात राहिला. पहाटे 5 वाजता आरोपीनं नाईकचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळला आणि तो दुचाकीवर घेऊन तलावामध्ये फेकण्यासाठी गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाईक याच्या खुनाची तक्रार देण्यासाठी आरोपी नाईक याच्या मुलासह पोलीस स्टेशनला देखील गेला होता. संपत्तीमुळे वृद्धाची हत्या झाल्याचा पोलिसांना सुरुवातीला संशय होता. मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ते दुकान चालवणाऱ्या तरुणापर्यंत पोहोचले.


शेअर करा