महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा..’अंदर बाहर’ चा खेळ आला होता रंगात : कुठे झाली कारवाई ?

शेअर करा

जुगार पुरुष खेळतात असा एक समज समाजामध्ये आहे मात्र महाराष्ट्रात महिला देखील जुगार खेळताना पकडले जाण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही मात्र खात्री करून घेण्यासाठी छापा टाकला तर धक्कादायक दृश्य समोर आले . घटना कोल्हापूर येथील असून टेंबलाई नाका झोपडपट्टीत जुगार अड्डा मालकिणीसह चक्क चार महिला दोन पुरुषांसोबत जुगार खेळता आढळल्या आहेत . ‘अंदर बाहर’ नावाचा जुगार खेळणाऱ्या या महिलांसह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राजारामपुरी परिसराला लागून असलेल्या टेंबलाईवाडी नाका झोपडपट्टीत जुगार अड्डा काही दिवसांपासून सुरु असल्याची माहिती खबरीमार्फत राजारामपुरी पोलिसांना मिळाली. शोभा हेगडे ही महिला हा अड्डा चालवत असून इतर बायका तिथे जुगार खेळायला नियमित येत असतात, अशीही माहिती मिळाली.

महिला गावठी हातभट्टीचे दारू अड्डे चालवतात हे पोलिसांनी ऐकलेले होते पण कोल्हापुरात जुगार अड्डा महिला चालवतात, ही माहितीच पोलिसांना नवीन वाटली. मात्र खात्री करण्यासाठी म्हणून पोलिसांनी छापा टाकला तेव्हा चक्क मालकिणीसह चार महिला व दोन पुरूष जुगार खेळत बसले होते. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयन्त केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले .

कोल्हापुरात मटका, जुगार पूर्णपणे बंद असल्याचा दावा पोलीस करत असले तरी आडोश्यात हे प्रकार सुरु आहेत .अर्धवट बांधकाम झालेली घरे असे यांचे मुख्य अड्डे आहेत. लॉकडाऊनच्या काळात रोजी रोटी नसल्याने रिकामा वेळ कसा घालणार ? त्यामुळे या धंद्याला सुगीचे दिवस आले आहेत . कोल्हापुरात महिलांचा जुगार अड्डा आढळल्याने पोलीस देखील चक्रावले असून अशा पद्धतीने आणखी कुठे जुगार अड्डा सुरू असेल तर माहिती द्यावी, त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी सांगितले

अटक केलेल्या महिलांची नावे शोभा संजय हेगडे (अड्ड्याची मालकीण ), निलम विजय कांबळे, वर्षा इकबाल लोंढे, भिंगरी अविनाश सकट, सुरेखा राजू नरंदेकर अशी आहेत तर सुनील संभाजी जाधव, करीम मोहिद्दीन खान या दोन पुरुषांना देखील अटक करण्यात आले आहे . घटनास्थळावरून सहा हजार रूपये रोख,दोन मोबाइल आणि जुगार खेळण्याचे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी केली आहे .


शेअर करा