‘ साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने की.. ‘, कोर्टाच्या निकालानंतर छगन भुजबळांचा शायराना अंदाज

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. त्यानंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं, असं सांगताना या सगळ्या प्रकरणानंतर आता आमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही…. कोणावरही लोभ नाही, असंही ते म्हणाले.

कंत्राटदाराला एक फूटही एफएसआय मिळाला नाही… आमच्यावर खोटे आरोप लावण्यात आले… यासगळ्या प्रकरणात विनाकारण मला तुरुंगवास सोसावा लागला. पण गणेशोत्सच्याआधी आमच्यावरचं संकट दूर झालं… सत्य परेशान हो सकता हैं… लेकीन पराजित नही…, असं भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित असलेल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त झाले आहेत. या प्रकरणातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा सर्वात मोठा निर्णय दिला. छगन भुजबळ यांच घोटाळा प्रकरणात दोन वर्ष जेलमध्ये राहावे लागले होते.

छगन भुजबळ यांच्याकडून आपलं नाव गुन्ह्यातून वगळावं अशी याचिका सत्र न्यायलयात दाखल करण्यात आली होती. भुजबळांच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने आज मोठा निर्णय देत, छगन भुजबळांना मुक्त केलं आहे. या प्रकरणात यापूर्वी 5 जणांना दोषमुक्तता करण्यात आलं असून सुरुवातीपासूनच आक्रमक असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहेत.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकण कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ, तनवीर शेख , इरम शेख , संजय जोशी , गीता जोशी , पीडब्ल्यूडी सचिव गंगाधर मराठे यांचं नावही महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून वगळण्यात आलं आहे.