पुणे हादरले.. उच्चशिक्षित गर्लफ्रेंडने ‘ सोनल ‘ चा दाबला गळा

पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढलेले पाहायला मिळत आहे. पुण्यात हडपसर इथे गर्लफ्रेंडनेच आपल्या बॉयफ्रेंडची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपी गर्लफ्रेंड स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असून उच्चशिक्षित असल्याचे समजते. रागात तिनं बॉयफ्रेंडचा गळा दाबून हत्या केली. पुण्यातल्या भेकराईनगरमध्ये ही घटना घडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सोनल पुरुषोत्तम दाभाडे ( वय ३४ ) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तर रोहिणी रामदास युनाते असं आरोपी तरुणीचं नाव आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सुरुवातीला प्रेमात त्यांनी लग्नाच्या आणाभाका देखील घेतल्या मात्र त्यानंतर दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहायला सुरु केले. लिव्ह इन रिलेशनशिपची हौस फिटताच त्यांच्यात भांडणे सुरु झाली होती.

29 ऑगस्टला हिंद कॉलनी ते राहत असलेल्या राहत्या घरात त्यांची भांडणे झाली आणि त्यानंतर हा प्रकार घडला. हडपसर पोलीस ठाण्यात सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती मात्र पोलीस तपास आणि शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर तरुणीनं हत्या केली असल्याचा उलगडा झाला. बुधवारी संबंधित तरुणीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. 29 ऑगस्टला सोनलसोबत रोहिणीचा वाद झाला. त्यामुळे रागात रोहिणीनं सोनलला ढकलल त्यात तो भिंतीवर आपटला. त्यानंतर तिनं रागाच्या भरता त्याचा गळा दाबला. त्यात त्याचा मृत्यू झाला.