पुणे हादरले..निवृत्त पोलीस अधिकारी समजून महिला त्याच्या घरी गेली खरी मात्र तिथे जाताच …

शेअर करा

पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पिंपरीत एका तोतया व्यक्तीने निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगत एका शिक्षिकेवर बलात्कार केला. विकास अवस्थी असे या नराधमाचे नाव असून संबंधित शिक्षिकेला पैशाची आर्थिक अडचण असल्याने त्यांनी ओळखीने आरोपी विकास अवस्थी याच्याकडे पैशाची मागणी केली होती . त्यानंतर आरोपीने तिला घरी बोलावून तिच्यासोबत हा प्रकार केल्याचा महिलेचा आरोप आहे.

उपलब्ध तक्रारीनुसार , आरोपी विकास अवस्थीने दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून पीडित महिलेला घरी बोलावून त्यांच्याकडून दोन कोऱ्या चेकवर ,कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर पीडित महिलेला सॉफ्टड्रिंक दिले आणि त्यानंतर तिला गुंगी आल्यावर तिच्यावर बलात्कार केला .त्यानंतर पीडित महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढले आणि ते सर्वांना दाखवून बदनामी करेल अशी त्या महिलेला धमकी दिली असल्याचे देखील पीडित महिलेचे म्हणणे आहे .

महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी विकास अवस्थीने पीडित महिलेला दुचाकीवरून घेऊन जात होता त्यावेळी लगट सुरु करताच पीडित महिलेने प्रतिकार केला पण तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकेन, मी सहाय्यक पोलीस आयुक्त आहे, माझं कोणीही काही करू शकत नाही, अशी धमकी दिली आणि जबरदस्तीने अत्याचार केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. त्यानंतर सांगवी पोलीस स्टेशन मध्ये तोतया सहाय्यक पोलीस आयुक्त विकास अवस्थी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे मुंबईतील साकीनाका इथल्या बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. साकीनाका येथील घटनेत महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता . जेव्हा ही महिला आढळून आली तेव्हाच या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला आहे .

सदर प्रकारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भाष्य केले असून ,’ साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅक चालवला जाईल ‘, असे आश्वासन दिले असून मुंबईतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


शेअर करा